नात्यात खोटे बोलणे म्हणजे तुमच्या जोडीदाराची फसवणूक करण्यासारखी असते, असं तुम्हाला नेहमी वाटत असेल, मात्र तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुमचं तुटणारं नात जर घट्ट जुळत असेल तर खोटं बोलणं कधी कधी गरजेचं आहे.
बर्याच वेळा असे घडते की तुमचा पार्टनर तुम्हाला खास वाटण्यासाठी किंवा तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी खूप मेहनत घेतो. हे शक्य आहे की त्यावेळी तुमचा मूड ऑफ असेल आणि त्याने तुमच्यासाठी भरपूर मेहनत करुनही तुमच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, मग खोटे बोलणं गरजेचं आहे, तुमच्या जोडीदारासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खोटं हास्य आणावं लागेल. यामुळे त्याने तुमच्यासाठी केलेल्या मेहनतीचा फायदा झाल्याचं तुमच्या जोडीदाराला वाटेल.
आपण कधी कधी खूप कामात असतो, कुठल्या तरी मोठ्या गोष्टीमध्ये अडकलेलो असतो, त्यामुळे आपल्याला कधी कधी आपल्या जोडीदाराची आठवण येत नाही, त्यामुळे आपण आपल्या जोडीदारासोबत बोलू शकत नाही किंवा जोडीदाराकडूनही काही कॉल येत नाहीत, अशावेळेला त्यांना कॉल किंवा मेसेज पाठवण्याची गरज असते आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीची किती आठवण येते हे मुद्दाम सांगावं लागतं, भलेही आपल्याला त्या व्यक्तीची आठवण आली नाही तरीही आपण तशाप्रकारे वागलं पाहिजे.
अनेक वेळा आपले जोडीदार आपल्यासाठी गिफ्ट विकत घेतात किंवा आपल्यासाठी काही ना काही प्लॅन करतात, कधी कधी आपला वाढदिवस स्पेशल करण्याचा प्लॅन आपल्या जोडीदाराचा असतो, पण आपल्याला भेटवस्तू किंवा बाहेर फिरणं किंवा कोणीतरी आपल्यासाठी प्लॅन करणं हे आपल्याला आवडत नाही, कधी कधी आपण या गोष्टी तोंडावर बोलून दाखवतो, त्यामुळे तसं न करता जरी आपल्याला काही गोष्टी आवडल्या नसल्या तरी आपण त्या स्विकारल्या पाहिले, कारण समोरच्या व्यक्तीच्या भावना त्या गोष्टींमध्ये अडकलेल्या असतात.
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा कधी कधी भुतकाळाबद्दल बोलत असतो. अनेकदा पार्टनरला आपल्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं असतं, मात्र आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टी ऐकून आपल्या जोडीदाराला राग येऊ शकतो, त्यामुळे तुमचा भूतकाळ कसाही असो, तो लपवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, किंवा त्याबद्दल खोटं बोललं पाहिजे.
जर तुमचा जोडीदार खूप मेहनतीने तुमच्यासाठी जेवण बनवलेलं असतं, पण अनेकदा जेवणामध्ये अनेक गोष्टींची कमी असते, म्हणून तुम्ही थेट पार्टनरला ओरडून चालणार नाही, तर जेवण छान झालय म्हणत तुम्ही जेवण केलं पाहिजे,