Condom in Corona Ward : ही बातमी आहे जोधपूरच्या कोव्हिड रुग्णालयातील. याच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा नंगानाच उघड झाला आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. एका टेबलच्या खाली दारुच्या बाटल्यांचा खच आणि कोंडोमचा पसारा असलेला पाहायला मिळला. (A pile of condoms in Corona ward video in Corona ward of Jodhpur)
राजस्थानच्या जोधपूरमधील सर्वात मोठ्या मथुरा दास माथूर रुग्णालयातील हा प्रकार आहे. रुग्णालयातील स्टाफच्या रूममधून रिकामी दारूच्या बाटल्या आणि काहीप्रमाणात कोंडोमही अढळून आले आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासन या घटनेवर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही.
तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. सफाई करताना सफाई कामगारांना धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला. दारुच्या बाटल्या, तंबाखू-गुटख्याची पाकिटे आणि कंडोमची पाकिटेही सापडल्याचं समोर आलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रुग्णालयात कर्मचार्यांच्या खोलीत, जिथे औषधे बॉक्समध्ये ठेवली जातात. तिथे त्या सर्व बॉक्समध्ये या सर्व गोष्टी सापडल्याने गोंधळ माजला आहे.