माझ्या पतीला 10 वर्षांपासून डायबिटीज आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सेक्स करतो तेव्हा संबंध तर अगदी व्यवस्थित होतात, पण नव-याचे वीर्यच बाहेर पडत नाही. याचे कारण काय असू शकते? हे इतर काही आजाराचे लक्षण आहे का?
अनेक वेळा मधुमेहामुळे पुरुषांना नसांच्या काही समस्या सुरू होतात. या समस्येत सेक्स ड्राईव्ह तर असते, प्रायव्हेट पार्टमध्ये तणावही असतो, त्यांचे लिंग स्त्रीच्या योनीत व्यवस्थित प्रवेशही करू शकते, तो पुरूष क्लायमॅक्सलाही पोहोचतो, त्यांना आनंद सुद्धा मिळतो पण वीर्य मात्र बाहेर पडत नाही. हे वीर्य बाहेर येण्याऐवजी अँटीग्रेड इजॅक्युलेशन) युरिनरी ब्लॅडरमध्ये जाते. या स्थितीला रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणतात. इंग्रजीत त्याला ड्राय रन म्हणतात.